तलवार मागे ढाल कोणाची ? काय सांगताय पोलीस अधीक्षक ? बघा व्हिडीओ…

बातमी कट्टा:- भरधाव स्कॉर्पिओ वाहनाला पोलीसांनी थांबवून तपासणी केली असता त्या स्कॉर्पिओ चारचाकी वाहनात चक्क 89 तलवारी व एक खंजीर मिळुन आल्याची घटना घडली होती.यानंतर आता गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाकडे सोपविण्यात आला आहे.या 89 तलवारी कुठून आणल्या गेल्या व कुठे कोणाला कशासाठी विकल्या जाणार याबाबत पोलीसांकडून तपास सुरु आहे.

व्हिडीओ बातमी

दि 27 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलींग करत असतांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर मध्यप्रदेश राज्याकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणारी एम एच 09 सिएम 0015 क्रमांकाची स्कॉर्पिओ वाहन पोलीसांना दिसून आली.पोलीसांनी त्या स्कॉर्पिओ वाहनाचा पाठलाग करत तीला थांबवली व विचारपूस केली असता वाहनातील चार ही संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.चारही जणांंना स्कॉर्पिओ वाहनातून खाली उतरवून वाहनाची तपासणी केली असता त्यात चक्क 89 तलवारी व एक खंजीर आदी मिळुन आले होते.

व्हिडीओ बातमी

पोलीसांनी जालना येथील चारही संशयितांना ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला होता.मात्र ८९ तलवारी नेमक्या कुठून आणल्या गेल्या होत्या आणि त्या कोणाला ? कश्यासाठी विकल्या जाणार होत्या याचे गुड अद्याप कायम आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे.या संशयितांबद्दल माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरु आहे.पोलीसांनी जप्त केलेली स्कॉर्पिओ अनेक वेळा वेग वेगळ्या मार्गाने चितोडकडे गेल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे या टोळीने नेमक्या किती तलवारी आणल्या आणि त्या कोणा कोणाला विकल्या याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलीसानं समोर आहे.

WhatsApp
Follow by Email
error: