बातमी कट्टा:- सरकारी जमीनीचा नजराना स्वअधिकाराने भरल्यामुळे चक्क तहसीलदार यांचा अधिकार जिल्हाधिकारी यांनी कमी केले आहेत.महसूल अधिकाऱ्यांवर अशा पध्दतीचे कारवाईची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे, सोंडले, बाभळे येथील सरकारी जमिनीचा नजराना स्वअधिकाराने भरल्यामुळे शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सैदाणे यांचे अधिकार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कमी केले आहेत.
ई -फेरफार प्रणालीमध्ये फेरफार करण्याचे तहसीलदार सैंदाणे यांचे अधिकार दोंडाईचा येथील अप्पर तहसीलदार अशा गांगुर्डे यांना, तर गाव नमुना क्रमांक एक क मधील तांत्रिक सत्ता प्रकारच्या शेतजमिनी बाबत कामकाजाचे अधिकार उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांना देण्यात आले आहेत.जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीचे कारवाईची ही पहिलीच वेळ आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या निदर्शनास ही चूक आल्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.