बातमी कट्टा- हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी ७ वाजता धरणाचे सोळा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजता तापी नदीपात्रात ४५ हजार ८०३ क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

येत्या काही तासात नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता द्वार परिचालन करण्यात येईल व नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येईल.
पुढील २४ ते ४८ तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. तरी तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.