
बातमी कट्टा:- तापी नदीला पुर आल्याने तापी नदीतील बॅक वॉटर अरुणावती नदीत सोडण्यात आले आहे. या बॅक वॉटर पाणीमुळे अरुणावती नदीवरील बाळदे पुल पाण्याखाली बुडाला आहे.यामुळे बाळदे परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. तर अरुणावती नदी काठावरील शेती पाण्यात बुडाली आहे.

तापी नदीत पुर आल्याने लात्रीत तापी नदीचे बॅक वॉटर सोडण्यात आले.या संपूर्ण बॅक वॉटर अरुणावती नदीत आल्याने रात्रीत अरुणावती काठावरील जातोडे, बाळदे, बोरगावसह तापी काठावरील टेंभे,वनावल उप्परपींड गिधाडे परिसरातील शेती पाण्याखाली बुडाली आहे.
शिरपूर तालुक्यातील बाळदे आणि जातोडे गावादरम्यान असलेला अरुणावती पुल पाण्याखाली बुडाला आहे. वेचणीला आलेला कापुस पिकांसह ईतर शेती पाण्यात बुडाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. तर काही दिवसांपासून कोरडीठक पडलेल्या अरुणावतीला रात्रीतून मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने बाळदे जातोडे परिसरातील नागरिकांनी पाणी बघण्यासाठी गर्दी केली होती.महसूल प्रशासनाच्या पथकाने सकाळी बाळदे,जातोडे वनावल परिसरात प्रत्यक्ष भेट देत माहिती जाणून घेतली आहे.