
बातमी कट्टा:- महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याची घटना आज दि 25 रोजी सकाळी घडली.दोन दिवसांपूर्वी दि 23 रोजी तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याने शोध सुरु असतांना मृतदेह आढळून आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर येथील महाविद्यालयात बिसीए अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या नितीन शरद महाजन या 19 वर्षीय तरुणाने दि 23 ऑक्टोबर रोजी सावळदे तापी पुलावरुन नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.दोन दिवसांपासून तापी नदीपात्रात त्याचा शोध सुरु असतांना आज दि 25 रोजी सकाळी नितीन महाजन याचा मृतदेह आढळून आला.शिरपूर तालुक्यातील बाभुळदे हे नितीन महाजन येथील रहिवासी होता.नितीन महाजन याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
