बातमी कट्टा:- तापी नदीपात्रात पुरुष जातीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे निदर्शनास आले असून नदीपात्राच्या मध्यभागी पाण्यात तरंगत असतांना पुलावरून ये जा करणाऱ्या प्रवासींना दिसून आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी नदी पात्रात एका पुरुष जातीचा मृतदेह प ण्यात तरंगत असल्याचे दिसून आले आहे.गिधाडे तापी पुलावरून ये जा करणाऱ्यांना हा मृतदेह दिसून आला असून पुलावर नागरिकांनी गर्दी केली आहे.हा मृतदेह नेमका कुणाचा याबाबत अद्याप माहिती मिळु शकलेली नाही.आज दुपारच्या सुमारास मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले आहे.