बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गवरील शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील तापी नदीपुलावरुन काल दि 6 रोजी सकाळी तापी नदीत एकाने उडी घेउन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.तापी पुलावर स्कुटी मोटरसायकल उभी करुन चपल्ला काढून नदीत उडी घेतली होती.सदर आत्महत्या करणारा व्यक्ती कोण याबाबत तपास सुरू असतांनाच शिक्षकाने तापीत उडी घेऊन जिवनप्रवास सपवल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार काल दि 6 रोजी सकाळी 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास एकाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.पुलावर संशयरित्या स्कुटी उभी होती.तर तापी नदीत एकाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसत होता.
पुलावर उभी असलेली एमएच 18 एयु 2226 क्रमांकाची ऍक्टिवा व्यक्तीचा स्कुटीच्या नंबरवरुन शोध घेतला असता धुळे तालुक्यातील नगाव येथील गंगामाई पब्लिक स्कुल येथे कार्यरत असलेले शिक्षक मनोहर पांडुरंग भदाणे वय 48 यांनी तापी नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याचे उघड झाले.मनोहर भदाणे यांच्या आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.