बातमी कट्टा:- घरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह तापी नदीत आढळल्याची घटना आज दि 24 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.पोटात दुखत असून दवाखान्यात जाऊन येतो असे सांगून बेपत्ता असतांना मृतदेह तापीनदीत आढळून आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शहाणा तानका माळी यांनी दिनांक 22 मार्च रोजी भाऊ प्रकाश तानका माळी बेपत्ता असल्याची तक्रार शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली होती.त्यांच्या सांगण्यानुसार शिरपूर शहरातील वरवाडे येथील प्रकाश तानका माळी हे दिनांक 18 मार्च रोजी रात्री नऊ वाजता पोटात दुखू लागल्याने कॉटेज हॉस्पिटल शिरपूर येथे उपचार कामी जातो असे सांगून गेले होते.मात्र प्रकाश माळी घरी परतले नाही त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.याबाबत बेपत्ता असल्याणी नोंद शिरपूर पोलीस स्टेशनात देण्यात आली होती.मात्र आज प्रकाश माळी यांचा मृतदेह तापी नदी पात्रात आढळून आला आहे.