बातमी कट्टा:- मंगळवारी झालेल्या मुसळवार पाऊसामुळे तापी नदी पुलाजवळील भराव खचल्याची घटना घडली आहे. यामुळे तापी पुलाला देखील मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या रस्त्यावरील खड्डे, पुलावरील खड्डे आणि आता तर चक्क भरावच खचल्याने संधीत अधिकारी याबाबत चौकशी करतील का ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार राहणार असा संतप्त सवाल वाहनधारक व नागरीकांकडून विचारला जाय आहे.
मंगळवारी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊसाने हजेरी लावली होती.यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा तापी नदीपुलाजवळील टाकरखेडा गावाच्या दिशेने असलेल्या पुलालगत असलेल्या रस्त्याचा भराव खचल्याची घटना घडली आहे.याच टाकरखेडा गावाच्या दिशेला पुर्वेकडीला बाजूच्या रस्त्याच्या भरावला देखील तडे गेले आहेत.यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहादा दोंदाईचा रस्त्यावरील सारंगखेडा तापी पुलावरील पडलेले खड्डे हा विषय सध्या खूपच चर्चेचा झाला असला तरी यावर तोडगा संबंधित विभाग काढत नसल्याने एखादी मोठी दुर्घटना होण्याची प्रशासन आणि संबंधित विभाग वाट तर बघत नाही ना असा प्रश्न या रस्त्यावरून ये- जा करणारे वाहनधारक करीत आहेत.
सारंगखेडा पासून तर शहादा पर्यंत रस्त्यांची प्रचंड दैन्यवस्था झाली असून याकडे पदाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी कोणीही लक्ष देत नाहीत. सोनगीर ते शहादा हा पूर्वी राज्य महामार्ग क्रमांक 1 चा मार्ग होता हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग 160 मध्ये वर्ग करण्यात आला आहे यामुळे या रस्त्याकडे कोण लक्ष घालणार हा विषय देखील चर्चा ठरत आहे.
या पूलाची दयनीय अवस्था झाली असून आता नवीन टाकरखेडा गावाजवळील पुलाला असलेला भराव खचल्याने या पुलावरून रहदारी करणे धोक्याचे ठरणार आहे. या रस्त्यावरून गुजरात ,राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यातून ये-जा करणारी मोठी अवजड वाहने यांची वर्दळ असते त्याच बरोबर वाळू वाहतूक करणारे देखील मोठी अवजड वाहने ये-जा करतात. टाकरखेडा गावाजवळील भराव खचल्याने पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर टाकरखेडा गावाजवळील याच पूर्वेकडचा भरावाला देखील तडे गेल्याने या पुलाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता परिसरातील नागरिक व वाहनधारक व्यक्त करीत आहे. हा भराव खचल्याने भविष्यात जरमोठा अनर्थ घडला तर याला जबाबदार कोण असा सवाल देखील नागरिक करीत आहेत पुलाच्या कठड्याला देखील अनेक ठिकाणी मोठमोठे तडे गेलेले आहेत याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का असआ प्रश्न आता उपस्थित होत आहे.