तापी नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन

बातमी कट्टा : तापी नदीवरील बॅरेज पाणीपातळी नियंत्रणासाठी सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे 2 गेट अर्धा मिटरने उघडण्यात आले असून आज सांयकाळी 6 वाजता सारंगखेडा बॅरेजमधून 3 हजार 197 आणि प्रकाशा बॅरेजमधून 3 हजार 560 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

तापी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. गावातील नागरीकांनी तापी नदीकाठाजवळ थांबू नये, नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: