बातमी कट्टा:- आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि 1 रोजी दुपारी घडली होती.दोन दिवसापासून बेपत्ता असतांना काल दि 1 रोजी त्याने तापीत उडी घेतली शोध सुरु असतांना आज दि 2 तापीनदी पात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील नदी पात्रात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काल दि 1 रोजी दुपारी घडली होती.सावळदे पुलावर बॅग व कागदपत्रे आढळून आले होते.त्यावरुन आत्महत्या करणारा तरुणाची ओळख निष्पन्न झाले होते.घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेतली असता रितेश विलास सोनवणे वय 22 रा.चांदसे ता.शिरपूर याने आत्महत्या केल्याचे समजले. रितेश दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होता.दि 1 रोजी त्याने तापीत उडी घेऊन आत्महत्या केली. रितेश सोनवणे याचा तापी नदीपात्रात शोध सुरु असतांंना आज दि 2 रोजी सकाळी रितेशचा मृतदेह आढळून आला.मृत रितेश सोनवणे याचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.रितेश आयटीआयचे शिक्षण घेत होता तो दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाला होता.मात्र दि 1 रोजी त्याने दुपारी मुंबई आग्रा महामार्गावरील सावळदे पुलावरून तापी नदीत आत्महत्या केली.