तापी नदीत आढळला “मृतदेह”

बातमी कट्टा:- तापी नदीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे.नदीच्या काठातील झाडाझुडुपांमध्ये मृतदेह आडकल्याने मृतदेह बाहेर काढण्यास जेसीबी मशीनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील कुरखळी शिवारात आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कुरखळीचे पोलीस पाटील वसंत धनगर यांच्या शेतालगत असलेल्या तापीनदी लगत झाडाच्या आडोशाला एका 40ते 45 वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह मिळून आला.यावरून सकाळी पोलीस पाटील यांनी थाळनेर पोलीस स्टेशन येथे घटनेची खबर दिली.त्यावरून थाळनेर पोलिस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक उमेश बोरसे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सदरच्या अनोळखी मृतदेह हा 25 ते 30 वयोगटातील पुरुष असून ओळख पटविण्यासाठी शिरपूर सह परिसरातील पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. झाडाझुडुपांमध्ये मृतदेह अडकल्याने जेसीबी मशीनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: