तापी नदीत उडी घेतल्याचा संशय..

बातमी कट्टा:- आज दि 24 रोजी दुपारच्या सुमारास गिधाडे तापी नदीपुलावरुन एका व्यक्तीने तापी नदीत उडी घेतल्याची चर्चा पुलावर उपस्थितांकडून केली जात आहे.पुलावर आधारकार्ड,शर्ट,पँट व चपल्ला मिळुन आल्याचे सांगितले जात आहे.त्या आधारकार्ड च्या आधारे चोपडा तालुक्यातील व्यक्तीने येथे उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 24 रोजी दुपारी गिधाडे तापी नदीपुलावरुन एका व्यक्तीने तापी नदीत उडी घेतल्याची चर्चा सुरु असून घटनास्थळावर नागरिकांनी गर्दी केली आहे.तापी नदी पुलावर आधारकार्ड,एक शर्ट,एक पँट,चपल मिळुन आल्याचे सांगितले जात आहे.घटनास्थळी मिळुन आलेल्या आधारकार्ड वरून तापी नदीत उडी घेणारा व्यक्ती हा चोपडा तालुक्यातील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याचे नातेवाईक देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.तापी नदीत उडी घेतल्याचा संशय येताच नागरिकांनी पुलावर गर्दी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: