बातमी कट्टा:- तापीनदी पुलावरुन एकाने तापी नदीत काल दि 4 रोजी रात्री उडी घेतल्याच्या संशयावरुन तापी नदीत शोध सुरु आहे. काल रात्री व आज सकाळ पासून तापी नदी पुलावर बघणाऱ्यांची गर्दी आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी नदी पुलावर काल दि 4 रोजी रात्री एकाने तापी नदी पात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून याबाबत रात्री तापी नदीपुलावर नागरिकांनी गर्दी केली आहे.आज सकाळपासून लोकांची गिधाडे तापीपुलावर गर्दी असून तापी नदीत शोध सुरु आहे.तापी पुलावर चपल व मोटरसायकल मिळुन आल्याने तापीत उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तापीत नदीपात्रात उडी घेतली की नाही याबाबत कुठलाही ठोस माहिती मिळुन आलेली नसुन फक्त घरातून बेपत्ता झालेल्या तरुणाची चप्पल पुलावर तापी पुलावर मिळुन आल्याने युवकाच्या नातेवाईक व घरच्या मंडळींकडून शोध सुरु आहे. पुलावर बघणाऱ्यांनी गर्दी केली आहे.मात्र ऐन सणासुदीला तापी नदीत उडी का घेतली असावी याबाबत तर्क वितरक लावण्यात येत आहे.