
बातमी कट्टा:- तापी नदीपात्रात उडी घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज दि 27 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तापी नदीपात्रात 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह मिळुन आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी नदी पुलावर आज दि 27 रोजी सकाळी एम एच 18 एक्स 1274 ही बजाज कंपनीची अज्ञात मोटरसायकल, पाकीट व मोबाईल मिळुन आले होते. मोटरसायकलीवरुन तपास केला असता सदर मोटरसायकल शिरपूर शहरातील दुधडेअरी कॉलनी येथील असल्याचे समजले असता नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोध सुरु केल्यानंतर गिधाडे तापी नदीतपात्रात शिरपूर शहरातील दुध डेअरी कॉलनीत राहणारा पुष्पराज अशोक पटेल वय 35 या तरुणाचा दुपारी 12 वाजेच्या सुमारास मृतदेह मिळुन आला आहे.सदर मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.
