बातमी कट्टा:- गिधाडे तापी नदीपुलावरुन तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र आत्महत्या बाबत अद्याप काही एक समजू शकलेले नाही.याबाबत पुलावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे.

मिळालेल्या माहिती प्रमाणे शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी नदी पुलावरुन तीन जणांनी आत्महत्या केल्याची शक्यता उपस्थित नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे. पुलावर पुरुषाचे व एका महिलेच्या चप्पला,विषारी औषधाची बाटली व एक मोटरसायकल आढळून आली आहे.यावरून तापी नदीत आत्महत्या केल्याची शक्यता उपस्थितांकडून वर्तविण्यात येत आहे.मात्र आत्महत्या बाबत काही एक स्पष्टता होऊ शकलेले नाही.मात्र तापी पुलावर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
याबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर सविस्तर बातमी लवकरच…
