
बातमी कट्टा:- तापी नदीपात्रात महिलेचा कुजलेल्या अस्वस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना आज दि 14 रोजी सकाळच्या सुमारास घडली असून घटनास्थळी थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावाजवळ तापी नदी काठावर महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पाण्यात तरंगत असतांना आढळून आला आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याने मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही.महिलेच्या अंगावर मात्र लाल रंगाची साडी असल्याचे सांगिण्यात आले असून घटनास्थळी वैद्यकीय अधिकारींच्या वतीने शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
