तापी नदीपात्रात महिलेची आत्महत्या ?

बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील तापी पुलावर निळ्या रंगाची स्कुटी मिळुन आली असून घटनास्थळी नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. महिलेने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून रात्री उशीरापर्यंत शोधकार्य सुरु होते.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील शिरपूर तालुक्यातील तापी नदीपुलावर दुपारी निळ्या रंगाची स्कुटी आढळून आली आहे. स्कुटीवरील क्रमांकावरुन स्कुटीची ओळख पटली असून
घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली होती.तापी पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती.महिलेने तापी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत तापीनदी पात्रात शोध सुरु होता.या घटनेबाबत अद्याप ठोस माहिती मिळु शकलेली नाही.

WhatsApp
Follow by Email
error: