
बातमी कट्टा:- तापी नदीपात्रात पाणी पातळीत वाढ झाल्याने तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देऊन तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.

दि १३ जुलै रोजी हतनुर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी ०५.०० वा. हतनुर धरणाचे. दहा दरवाजे प्रत्येकी एक मीटरने उघडण्यात येवून 560.00 क्युमेक्स (19779) क्यूसेक विसर्ग तापी नदी पात्रता सोडण्यात आला आहे. सद्यस्थितीत सुलवाडे बेरेज मध्यम प्रकल्पाचे चार द्वार अर्धा मीटर उंचीने उघडून 6667.83 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. तापी नदीवरील पाण्याचा येवा लक्षात घेता सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पातून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पुढील 3 तासात विसर्ग वाढविण्यात येऊन तापी नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
तरी तापी काठावरच्या गावातील नागरिकांना सूचना देऊन तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे करिता कळविण्यात यावे ही विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.