बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावर चप्पल व मोबाईल ठेऊन तरुणाने तापी नदीत आत्महत्या केल्याची घटना घडली आली आहे.दोन दिवसांपासून तरुणाचा तापी नदीत शोध सुरु होता.मात्र आज दि 5 रोजी त्याचा नदीत मृतदेह मिळुन आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील अंबिका नगर येथे राहणारा राहुल रवींद्र पाटील या तरुणाने त्याच्या भावाला दि 3 रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास फोन करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती. त्यावरून भावाने सर्व नातेवाईक व मित्र परिवाराला माहिती दिल्याने सर्वांनी सावळदे तापी पुलावर एकच गर्दी करत राहुलला शोधण्यासाठी सावळदे येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले होते.घटनास्थळी शिरपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले होते.
सावळदे तापी पुलावर राहुलचे मोबाईल व चप्पल मिळुन आले होते.दोन दिवसांपासून शोधकार्य सुरु असतांना राहुल पाटील याचा आज दि 5 रोजी तापी नदीपात्रात मृतदेह मिळुन आला.राहुलच्या पश्चात भाऊ भोला रवींद्र पाटील, वहिनी,बहीण आहे.