बातमी कट्टा:-गिधाडे तापी नदी पुलावरुन महिलेसह तीघांनी नदीत उडी घेतल्याची चर्चा होती.संशय व्यक्त असलेल्या त्या तिघांची ओळख पटली आहे.नदीत उडी घेतल्याची चर्चा सुरु असलेल्या त्यांचा संपूर्ण घराचा शेतीवर उदरनिर्वाह आहे,संपूर्ण कुंटुंबीय स्वाध्यायी असुन घरात आई,वडील,मुलगा सुन अन दोन नातवंडे असा परिवार आहे तर मोठा मुलाचा विभक्त संसार असल्याचे सांगण्यात येत आहे.सुखी समाधानी कुटुंब असतांना नेमक असे काय झाले ज्यामुळे आई,वडील व मुलाला टोकाचे पाऊल उचलावे लागले असावे.पुलावर मिळुन आलेल्या मोटरसायकल मध्ये एक सुसाईड नोट पोलिसांना मिळुन आली आहे.

दि 22 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी नदी पुलावरुन एक महिला व दोन पुरुषांनी तापी नदीत उडी घेतल्याची चर्चा सुरु होती.प्रथमदर्शनी उडी घेतांना एकाने बघितले असल्याचे सांगण्यात आले होते.गिधाडे तापी पुलावर एक किटकनाशक विषारी औषधाची बाटली व एम.एच 18 .8334 क्रमांकाची बॉक्सर मोटरसायकल व चपल्ला आढळून आलेत.मात्र हे कोणाचे याबाबत काही एक तपास लागत नव्हता.
मोटरसायकलीत होती सुसाईड नोट…
घटनास्थळावरुन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एम.एच 18,8334 या मोटरसायकलीत एक सुसाईड नोट पोलिसांना मिळुन आल्याची माहिती मिळाली आहे. मोटरसायकलीचे स्टुलबॉक्स जवळ ही सुसाईट नोट मिळुन आली आहे.
सोशल मिडीयावर घटनेची माहिती व्हायरल केल्यानंतर याप्रकरणाचा उलगडा झाला
घटनास्थळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड व पथक येऊन पाहणी करुन गेले व घटनेची चौकशी केली.घटनास्थळावर मिळालेली मोटरसायकल जुनी असल्याने आरटीओ कार्यालयातून त्या मोटरसायकल बाबत माहिती मिळाली नाही यामुळे शिंदखेडा पोलीस स्टेशन कडून सोशल मिडीयात मोटरसायकलीचा फोटो देऊन याबाबत माहिती कळवण्यासाठी सुचित करण्यात आले होते यावरुन संपूर्ण माहिती प्राप्त झाली आहे.

शहादा तालुक्यातील लोंढरे येथील आई,वडील व मुलगा…
याबाबत तपास केल्यानंतर शहादा तालुक्यातील लोंढरे येथील एकाच घरातील आई वडील व मुलगा यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.शहादा तालुक्यातील लोंढरे येथील नथा बुधा वाघ (माळी) वय 56,त्यांची पत्नी सखुबाई नथा वाघ (माळी) 51 व मुलगा गोपाल नथा वाघ (माळी) वय 30 हे घरातून बेपत्ता असून मोटरसायकलीवरुन या तिघांनीच टोकाचे पाऊल उचले असावे अशी चर्चा असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे मात्र या मागील कारण समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहिती नुसार नथा बुधा वाघ यांना दोन मुले आहेत दोघांचा विवाह झाला होता.यात मोठा मुलगा विभक्त राहत होता तर नथा वाघ व त्यांच्या पत्नी सखुबाई वाघ या लहान मुलगा गोपाल वाघ यांच्यासोबत एकत्र राहत होते. स्वाध्यायी कुटुंब म्हणून या परिवाराची ओळख होती.सर्व काही गुण्यागोविंदाने सुरु असतांना संपूर्ण कुटुंबाचे शेतीवरच उदरनिर्वाह होता.गोपाल वाघ यांना एक दहा वर्षाचा तर एक 7 वर्षाचा असे दोन लहान मुल आहेत.काल त्यांची मोटरसायकल गिधाडे तापी नदी पुलावर मिळून आली होती. प्रथमदर्शनी उपस्थितांनी सांगितल्यानुसार नदीत तीन जणांनी उडी घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.याबाबत नातेवाईकांना माहिती प्राप्त झाली.
आज सकाळी नातलग शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे येऊन गेले…
आज सकाळी नथा वाघ यांचा मोठा मुलगा व त्यांचे नातेवाईक शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे येऊन गेले.काल हातनूर धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदीपात्रात गढुळ पाण्याचे मोठ्याप्रमाणात लाटा वाहत आहेत.नदीत पाण्याची पातळी वाढल्याने घटनास्थळी काही एक समजु शकलेले नव्हते.