
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील सावळदे लगत तापी नदी पुलावर दुचाकी उभी करून एका अज्ञात व्यक्तीने पुलावरून तापी नदीत उडी घेतल्याची घटना 6 एप्रिल 2022 रोजी बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.

तालुक्यातील सावळदे येथील तापी नदी पुलावर 6 एप्रिल 2022 रोजी बुधवारी सकाळी पुलावरून जाणाऱ्या काही नागरिकांना एमएच 18 एयु 2226 क्रमांकाची ऍक्टिवा दुचाकी संशयास्पद उभी दिसून आली तसेच जवळच चपला दिसून आल्याने संशय व्यक्त करीत तापी नदी पात्रात पुलावरून पाहणी केली असता नदी पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तंरगतांना आढळून आला. घटनास्थळा वरील नागरिकांकडून दुचाकीच्या नंबर वरून व्यक्तीचे नाव गाव शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्याची माहिती घटनास्थळावरून नागरिकांनी दिली.
