तापी पुलावरून क्रेनच्या मदतीने गणपती विसर्जन करतांना तोल सुटला, तापी पात्रातील पाण्यात वाहून जातांना सावळदे उपसरपंच सचिन जाधव व त्यांच्या रेस्क्यू टिमने वाचवले प्राण

बातमी कट्टा :- तापी पुलावरून क्रेनच्या मदतीने गणपती विसर्जन करताना एकाचा तोल जाऊन व्यक्ती तापी नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी तात्काळ सावळदे गावाचे उपसरपंच सचिन राजपूत आणि त्यांच्या रेस्क्यू टीमने धाव घेतल्याने त्या व्यक्तीचे प्राण वाचले आहे. उपसरपंच सचिन राजपूत व त्यांची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली नसती तर कदाचित तो व्यक्ती पाण्यात बुडून वाहून गेला असता.

धुळे जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळाचे मोठे गणपती तापी पुलावरून तापी नदी पात्रात क्रेनच्या मदतीने विसर्जित करण्यात येत असतात. पुलावरून गणपती क्रेन द्वारे तापीत विसर्जन करताना मोठी कसरत यावेळी करावी लागत असते. पुलावरून गणपती विसर्जन करताना धोकेदायक परिस्थिती देखील यामुळे निर्माण हत असते. असे असताना आज सकाळी क्रेन द्वारे गणपती तापी नदी पात्रात विसर्जन करतांना क्रेनच्या दोरीवर हात सुटून तोल गेल्याने सावळे येथील कैलास सैंदाणे हा व्यक्ती तापी नदीपात्रात कोसळला.तापी नदीपात्रात वाहत पाणी असल्याने कैलास सैंदाणे वाहतांना उपसरपंच सचिन राजपूत व त्यांच्या रेस्क्यू टिमने तात्काळ बोटीद्वारे घटनास्थळी धाव घेत कैलास सैंदाणे यांना पाण्यातून बाहेर काढले.यामुळे कैलास राजपूत यांचे प्राण वाचले.सरंपच सचिन राजपूत आणि त्यांची रेस्क्यू टिम देवासारखे धावून आल्याने कैलास सैंदाणे यांचे प्राण वाचले आहे.धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सावळे याठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून साहित्यांची मदत झाल्याने कैलास सैंदाणे यांना वाचविण्यात यश प्राप्त झाले आहे.

सावळदे ग्रामपंचायत तर्फे सावळदे येथे गणपती विसर्जनासाठी तापी काठावर घाटाची निर्मिती करण्यात आली आहे.याठिकाणी सचिन राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता,लाईट व रुग्णवाहिका व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून बोट,लाईट जॅकेट,रिंग आदी वस्तू देण्यात आले आहेत.सोबतच पट्टीचे पोहचणारे 24 तास याठिकाणी तैनात करण्यात आले असतांना मंडळाचे गणपती पुलावरुन जिव धोक्यात घालून गणपती विसर्जन करत असल्याचे चित्र बघायला मिळत पुलावरून गणपती विसर्जन प्रशासनाकडून रोखणे अपेक्षित आहे अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: