तापी पुलावर क्रुझरचा अपघात, अज्ञात वाहन तापी नदीत कोसळले

बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी नदी पुलावर मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा टायर फुटल्याने क्रुझर पुलावर पलटी झाल्यानंतर मागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाचा तोल जाऊन अवजड वाहन पुलाचे कठडे तोडून तापी नदीत कोसळल्याची घटना आज दि २३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे.

वैजापूर येथून एम पी o९ एफ ए ६४८७ क्रमांकाची क्रुझर मजूर घेऊन मध्यप्रदेश राज्यातील शेंधवाकडे जात असतांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावर क्रुझरचा टायर फुटला.यामुळे क्रुझरचा समतोल बिघडल्याने यावेळी मागून येणाऱ्या अज्ञात अवजड वाहनाचा तोल गेल्याने वाहन तापी पुलाचे कठडे तोडून तापी नदीत कोसळला.तर क्रुझर वाहन तापी पुलावर पलटला आहे.क्रुझर मधील मजूर किरकोळ जखमी झाले आहेत.जखमींवर शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अंधार असल्याने तापी नदीत कोसळणारे वाहन नेमके कोणते आहे याबाबत अद्याप ठोस माहिती मिळु शकलेली नाही. यात्र घटनास्थळी पुलाचे कठडे तुटल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी शिरपूर शहर व नरडाणा पोलीस दाखल झाले आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: