
बातमी कट्टा:-सावळदे तापी नदी पुलावर आज दि 26 रोजी सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास एक निळ्या रंगाची स्कुटी उभी होती.पोलीस घटनास्थळी दाखल होत पुलावर उभी असलेली मोटारसायकल(स्कुटी) ताब्यात घेतली आहे.स्कुटी वर आलेल्या व्यक्तीने तापी नदीत उडी घेतल्याचा संशय घेण्यात येत आहे.मात्र याबाबत ठोस माहिती अद्याप मिळु शकलेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावर जि.जे 05 एस,एक्स 7157 क्रमांच्या निळ्या रंगाची मोटारसायकल (स्कुटी) सावळदे तापी नदी पुलावर मिळुन आली आहे.सदर (स्कुटी) मोटरसायकल बेवारसपणे तापी नदी पुलावर उभी असल्याचे ये जा करणाऱ्या प्रवासींना दिसुन आली आहे.पुलाच्या विरुध्द दिशेला तापी पुलावरील कठड्याचे काम सुरु होते. घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल होत चौकशी करण्यात आली. पोलीसांकडून सदर स्कुटी (मोटरसायकल ) ताब्यात घेतली आहे.स्कुटी नेमकी कोणाची याबाबत पोलीसांकडून शोध सुरु आहे.स्कुटी वर आलेल्या व्यक्तीने तापी नदीत उडी घेतल्याचा संशय घेण्यात येत आहे.मात्र याबाबत ठोस माहिती अद्याप मिळु शकलेली नाही.