
बातमी कट्टा:- तिहेरी अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.ओव्हरटेकच्या नादात हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शहादा – दोंडाईचा रस्त्यावर टाकरखेडा निमगुळ गावादरम्यान शहाद्याकडून दोंडाईचा कडे जाणारी जी जे 16 डसी 3888 क्रमांकाची कार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून दोंडाईचा येथुन शहादा कडे जाणाऱ्या एम एच 39 जे 8783 क्रमांकाच्या कारला धडकली. यानंतर कारचे नियंत्रण सुटल्याने कारने एम.एच 20 सीएस 6221 क्रमांकाच्या क्रुझरला धडकली.या तिहेरी भीषण अपघातात जुबेद असमत कुरेशी वय 40 रा.नागपूर यांच्यासह सबा जुबेर कुरेशी,जुबेदाबानू अहमदखान, शाहरुख खान,नायशा कुरेशी,चालक हर्षद मेमन यांना उपचारासाठी दोंडाईचा येथे दाखल केले. यावेळी जुबेद कुरेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.वेळेत उपचार न मिळाल्याने जुबेद यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
