बातमी कट्टा:- भाडेतत्त्वाच्या घरावरुन 34 वर्षीय तरुणाचा रात्रीच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.पोलीसांनी काही तासातच एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार साक्री रोडवरील गुरुकुल हायस्कूल परिसरातील रवींद्र काशीनाथ पगारे या 34 वर्षीय तरुणाचा घरात घुसून तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना दि 20 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक,पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या फौजफाटा दाखल झाला होता.काही तासातच पोलिसांनी जयेश उर्फ दाद मोरे नामक व्यक्तीला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.भाडेत्वाच्या घरावरुन रवींद्र पगारे यांचा खून झाल्याचे सांगितले जात आहे.