तीक्ष्ण हत्याराने खून करणारा पोलीसांच्या ताब्यात

बातमी कट्टा:- अज्ञात इसमाचा तिक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना घडली होती.याबाबत पोलीसांनी कसून चौकशी करत मृतदेहाची ओळख पटवून खून करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

नाशिक :- लासलगाव ते मनमाड रोडच्या बाजुला वागर्डी धरणाजवळ पडीत जागेवर चांदवड पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता.तिक्ष्ण हत्याराने खून केल्याचे प्रथमदर्शनी पोलीसांना दिसून आले होते.याबाबत नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली.पोलिस अधिक्षकांनी पथकातील पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती दिली.याबाबत चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांना माहिती देत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या सह पथकाने मनमाड चांदवड रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेल्या संशयिताची माहिती घेऊन चांदवड तालुक्यातील गंगावे येथे जावून संशयिताची चौकशी केली असता तो मिळुन आला.त्याने त्याचे नाव दत्तात्रय विश्वनाथ उबाळे असे सांगितले विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलीसांनी कसुन चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली.मयत व्यक्तीचे नाव अनिल रतन अहिरे असल्याचे सांगितले याबाबत चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे तपास करीत आहेत.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील समीर बारवकर,सागर शिंपी,संदिप पाटील,मुकेश गुजर,विठ्ठल बागुल, सोनवणे, लोखंडे,गांगुर्डे, कुणाल मोरे, मनमाड पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथक आदींनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: