बातमी कट्टा:- काँलनी परिसरातून मोटारसायकल चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीतील तीन संशयितांना पोलिसांनी जप्त केले आहे.संशयितांकडून 4 लाख 50 हजार किंमतीचे 13 मोटासायकली ताब्यात घेतले आहे.
साक्री पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील मुकूंद नगर, आंबापूर रोड येथून काही दिवसांपूर्वी मोटरसायकल चोरी केल्याची साक्री पोलीस स्टेशनात दाखल झाल्या होत्या. याबाबत साक्री पोलीसांकडुन मोटरसायकल चोरांंचा शोध सुरु असतांना पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर संशियित भावेश यशवंत हिरे रा.गणेशपूर, राहुल रमेश भावसार, रा.भाडणे व ज्ञानेश्वर गोरख सोनवणे रा.साक्री यांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून काँलनी परिसरातून चोरी केलेल्या 4 लाख 50 हजार किंमतीचे 13 मोटारसायकली जप्त करण्यात आले आहे. हिरोहोंडा, स्प्लेंडर प्लस, एच.एफ.डिलक्स सी.पी. हंड्रेड,प्लेटिना,पल्सर आदी कंपनीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत.
सदर कारवाई साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोसई बी.बी.नऱ्हे,आर.बी.निकम पोलिस हे.कॉ. बापू रायते,सुनील अहिरे,चेतन गोसावी,तुषार जाधव आदींनी केली आहे .