ती मला माफ करेल का ? निशब्द करणाऱ्या घटनेनंतर त्याच रात्री आम्ही पोहचलो चिमुकली पर्यंत….

बातमी कट्टा:- ती मला माफ करेल का ? या शिर्षकाखाली पत्रकार प्रशांत परदेशी यांनी आपल्या फेसबुक सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पळासनेर येथील अपघातातील निशब्द करणारा अनुभव मांडला होता.एका संवेदनशील पत्रकाराने अपघातातील अनुभवलेल्या वेदनांचा हा लेख बातमी कट्टा न्युज पोर्टलने प्रकाशीत केला. लेख वाचल्यानंतर अनेकांनी संपर्क करुन व वॉटसअप वर प्रतिक्रिया देत त्या चिमुकलीला मदत करण्याची ईच्छा व्यक्त केली.जनतेकडून मिळणारी मदत प्रत्यक्ष त्या चिमुकलीला व्हावी म्हणून लेख प्रकाशित केलेल्या दिवशीच रात्री बातमी कट्टा ची टिम तिच्या पर्यंत पोहचली.तीला कशा पध्दतीने मदत करता येईल ? तीला काय आवश्यक आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

दि 4 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पळासनेर येथे झालेल्या भीषण अपघाताची घटना घडली होती.घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांसह शिरपूर व धुळे येथून पत्रकार घटनास्थळी दाखल झाले.घटनेची दिवसभर बातमी केल्यानंतर पत्रकार पत्रकार प्रशांत परदेशी पळासनेर गावाजवळील कोळसापाणी या पाड्यावर पोहचले.या अपघातात एकाच पाड्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची मन हेलवणारी घटना घडली होती.यादरम्यान पत्रकार प्रशांत परदेशी यांंना एक चिमुकली घराबाहेर उभी असल्याचे दिसली आणि त्यानंतर काय घडले त्यांनी ते आपल्या फेसबुक वर “ती मला माफ करेल का ?” या शिर्षकाखाली अपघातातील निशब्द करणारा अनुभव मांडला.

त्यांची ही मन हेलवणारी कहाणी बातमी कट्टा न्युज पोर्टलने प्रकाशित केली.त्यानंतर तो लेख मोठ्या प्रमाणात सर्वत्र व्हायरल झाला.घटनेबाबत अनेकांकडून दखल घेत विचारपूस करण्यासाठी बातमीकट्टा सोबत संपर्क करण्यात आला. तीचे नाव काय ? ती आता कुठे आहे ? तीची आई कुठे आहे. तीला कोणी मदत करत आहेत का ? तीला मदत करण्यासाठी काय करावे लागेल,तीला कशी मदत करता येईल ? असे असंख्य प्रतिक्रिया वॉटसअप द्वारे व फोन द्वारे विचारण्यात येत होते.चिमुकलीच्या काळजीपोटी सर्वसामान्य जनता बातमी कट्टा टिम ला संपर्क करत असल्याने त्याच दिवशी दि 5 रोजी आम्ही ठरवले की, पहिले प्रत्यक्ष त्या चिमुकलीला भेटून तीला काय मदत करता येईल आताची येथील परिस्थिती काय या संपूर्ण गोष्टींचा मागोवा घेण्याकरिता आम्ही दि 5 रोजी रात्री तिच्या पर्यंत पोहचलो यावेळी मोहिदा गावाचे पोलीस पाटील देखील उपस्थित होते.

पळासनेर अपघातात त्या चिमुकलीला आपला पहिलीत शिक्षण घेणारा भाऊ गमवावा लागला तर आई आणि बहिण गंभीर जखमी झाल्याने त्यांना धुळे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.घरी फक्त आजी आणि आजोबा असल्याने आजी आजोबासह चिमुकली पाड्यापासून एक ते दोन किमी अंतरावर असलेल्या काकांच्या शेतातील घरी राहण्यासाठी गेली होती.आम्ही कोळसापाणी येथे पोहचल्यानंतर तिला भेटण्यासाठी तेथून त्या शेतातील घरापर्यंत आम्ही पोहचलो. तेथे ती तीचे आजी आजोबा पोलीस पाटील गावातील नागरिक देखील उपस्थित होते.चिमुकली कोळसापाणी येथील पाड्यावर जि प शाळेत चौथीचे शिक्षण घेत असून पुढील शिक्षणासाठी तीला कोळसापाणी या पाड्याबाहेर जावे लागणार आहे.तीला शिक्षणाची काही सोय करता येईल का ?,घरातील सदस्य मंडळींनी शिक्षणासाठी चिमुकलीला बाहेर पाठवावे,तीला काय मदत करता येईल व कशी मदत करता येईल,आता तीला काय आवश्यक आहे. याबाबत विचारपूस करून आम्ही तेथून पुन्हा परत निघालो.याबाबत संपूर्ण माहिती पत्रकार प्रशांत परदेशी यांनी फोनवर दिली.मात्र तीला आर्थिक मदत करावी की आणखी काही वेगळी संकल्पना आहे. ज्यामुळे तीला मिळणारी मदत तीच्या भविष्यात तीला उपयोगी होईल याचा आम्ही विचार करत आहोत. कारण तीला मिळणारी मदत ही तिच्या पर्यंत आणि तिच्या आयुष्यात कामात यावी ही आमची तळमळ आहे. यासाठी आपणास देखील काही सुचत असणार तर आम्हाला नक्की कळवावे.

अमोल राजपूत 9404560892
योगेश्वर मोरे     9767466230

WhatsApp
Follow by Email
error: