तोतया पोलीसांच्या खऱ्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

बातमी कट्टा:- पोलीस असल्याचे बनाव करत वृद्ध व्यक्तीच्या हातातील सहा ग्रँम सोन्याची आंगठीसह चार हजार रुपये रोख व घड्याळ चोरुन नेल्याची घटना दि 9 रोजी भरदुपारी घडली होती. याबाबत पोलीसांकडून तपास सुरु असतांना धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेत शिरपूर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

विजय वाल्मिक देसले रा.शेरुळ ता.मालेगाव हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी शिरपूर येथे आले होते ते 9 फेब्रुवारी रोजी करवंद नाक्यावरील रिलायन्स ट्रेंड जवळ किराणा बाजार करून बसलेले असतांना दुचाकीवरून 45 ते 50 वयोगटातील दोन अनोळखी व्यक्ती जवळ येत आम्ही पोलीस असून अवैध गांजाची वाहतूक होत असल्याने झडती घेण्याचे सांगून विश्वास संपादन करीत खिशातील पैसे घड्याळ व हातातील सोन्याची अंगठी पिशवीत ठेवण्याचे सांगून हातचलाखी करीत 4 हजार रुपये रोख,घड्याळ व साडे सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरून नेल्याची घटना घडली होती.याबाबत विजय देसले यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या घटनेचा पोलीसांकडून तपास सुरु असतांना दि 17 रोजी दुपारी 12 ते 12:30 वाजेच्या सुमारास धुळे येथील आझादनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दोन इसम व्हिआयपी मोटरसायकलीने फिरत असल्याने त्यांच्यावर संशय आला.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असता.दोघांनी जावेद अली नौशाद अली रा.मुस्लीम कॉलनी,खडका भुसावळ व जफर हुसैन हजन हुसैन रा.रेल्वे कॉलनी परळी बीड असे सांगितले दोघांनी सांगितले.पोलीसांनी दोघांची कसून विचारपूस केली असता दोघांनी तोतया पोलीस बनून दि 9 रोजी हातचालाखी करुन सोन्याची अंगठी व पैसे चोरल्याची कबुली दिली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: