बातमी कट्टा:- उड्डाणपूलाखाली भिक्षूकाचा अज्ञातांनी खून केल्याची घटना दि 20 फेब्रुवारी रोजी घडली होती.याबाबत पोलीसांकडून शोध सुरु होता.बाप बेटासह साथीदाराच्या मदतीने भिक्षुकाचा दगडाने ठेचून खून केल्याचे पोलीसांच्या तपासात उघघड झाले आहे.तिघांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

दि 20 फेब्रुवारी रोजी धुळे शहरालगत मोहाडी जवळील उड्डाणपुलखाली यशवंतराव कृषी विद्यालयाच्या भिंतीला लागुन सर्विस रोवर 55 ते 60 वयोगटातील भिक्षुकाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली होती.याबाबत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकरराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन व मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत संमातर तपास सुरु होता.मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी डी.एस.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हेकॉ शाम काळे,गणेश भामरे,जितेंद्र वाघ,सचिन वाघ अशांनी तपास सुरु केला असतांना अनोळखी भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या त्या भिक्षुकाचे दोन ते चार दिवसांपूर्वी मोहाडी येथील संजय पखाले याच्याशी जोराचे भांडण झाल्याची माहिती प्राप्त झाली होती.पथक त्याच्या घरी गेले असता संजय पखाले गुन्हा घडल्यापासून घरी आलाच नसल्याची माहिती पोलीसांनी मिळाली.पोलीसांनी संजय पखाले याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता नातेवाईक व संजय पाखले यांचा मुलगा प्रतिक पाखले हे पथक बघून पळून गेले.त्यांचा शोध घेतला असता प्रतिक पखाले पोलीसांना मिळुन आला.पोलीसांनी अधिक विचारपूस केली असता प्रतीक पखाले याने खूनाची कबुली दिली. प्रतीक पखाले त्याचे वडील संजय पखाले व त्यांचा साथीदार आकाश ऊर्फ गुरु जगन्नाथ बोरसे रा.मोहाडी आदींनी दगडाने ठेचून खून केल्याचे उघड झाले आहे.
पोलीसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे तसेच मोहाडी पोस्टेचे गुन्हे शाखेचे शागम काळे,प्रभाकर ब्राम्हणे,गणेश भामरे,जितेंद्र वाघ,सचिन वाघ,धिरज गवते,राहुल गुंजाळ आदींनी केली आहे.
