बातमी कट्टा:- कानबाई उत्सव कार्यक्रम आटोपून गावी जात असतांना पती -पत्नी मुलगीसह दोन जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.भरधाव वेगाने चारचाकी कार उभ्या ट्रॅक्टरला मागून धडकली.या भीषण अपघातात कारमधील चार आणि ट्रॅक्टरवरील एकाचा मृत्यू झाला तर दोन लहान मुला मुलीवर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील गव्हाणे फाट्याजवळ दि 1 रोजी दुपारी भीषण अपघात घडला.भरधाव वेगाने येणारी एम एच 02 डिएस 1277 क्रमांकाची व्हर्ना कार उभ्या ट्रॅक्टरला मागून धडकली.
नाशिक येथील उत्तम नगर भागात राहणारे संदिप शिवाजी चव्हाण हे त्यांची पत्नी मुली मुलांसह मित्र गणेश छोटु चौधरी सोबत शिरपूर येथे शालक दशरत कोळी यांच्याकडे कानबाई कार्यक्रमाच्या उत्सवासाठी आले होते.दि 1 रोजी दुपारी कार्यक्रम आटोपल्यानंतर संदिप शिवाजी चव्हाण त्यांची पत्नी मीना संदिप चव्हाण ,मुलगी साक्षी चव्हाण,मुलगी जान्हवी चव्हाण,मुलगा गणेश चव्हाण ,मित्र गणेश छोटु चौधरी,आदी जण एम एच 02 डिएस 1277 क्रमांकाची व्हर्ना कारने नाशिक येथे जण्यासाठी निघाले. दुपारी शिरपूर येथून निघाल्यानंतर मुंबई आग्रा महामार्गावरील गव्हाणे फाटा येथे सोनगीर टोलनाकावरील ट्रॅक्टर कामासाठी उभे होते. यावेळी भरधाव व्हर्ना कारने धुळेच्या दिशेन जात असतांना उभ्या ट्रॅक्टरला धडकली.
या कार मधील संदिप चव्हाण आणि त्यांचे मित्र गणेश चौधरी यांचा जागिच मृत्यू झाला.तर ट्रॅक्टरवर काम करणारा मजूर पांढुरंग महाजन यांचा या अपघात जागिच मृत्यू झाला. यादरम्यान सदस्य ललित वारुळे येथे आपल्या चारचाकी कारने नरडाणा येथून शिरपूरकडे जात असतांना त्यांना अपघाताचे भीषण दृश्य दिसताच त्यांनी तात्काळ मदत कार्यासाठी धाव घेत संदिप भावसार,केतन हेमंत जैन यांच्या मदतीने अपघातग्रस्त कारच्या मागे बसलेल्या मिना संदिप चव्हाण, त्यांची मुलगी साक्षी संदिप चव्हाण,मुलगी (परी) जान्हवी चव्हाण आणि मुलगा गणेश चव्हाण यांना गंभीर अवस्थेत ललित वारुळे यांनी स्वताच्या वाहनाने घेऊन नरडाणा येथील रुग्णालयात दाखल केले मात्र गंभीर जखमी असल्याने ललित वारुळे यांनी आपल्या खाजगी वाहनाने जखमींना धुळे येथील रुग्णालयात दाखल केले.यावेळी पंकज देवरे यांच्या रुग्णालयात मिना चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर छत्रपती हॉस्पिटल येथे लहान मुलगी जान्हवी चव्हाण हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.यात मुलगा गणेश चव्हाण हा गंभीर असल्याने त्याच्यावर छत्रपती हॉस्पिटल रुग्णालयात उपचार सुरु असून अपघातात साक्षी चव्हाण या मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे.या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.