व्हिडीओ बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/n-p1nKiNmxQ
बातमी कट्टा:- धुळे येथील क्युमाईन क्लब येथे आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाच्यावतीने सुरु असलेल्या उपोषणाची प्रशासनाने दखल घ्यावी याबाबत शिरपूर प्रांताधिकारी यांना आज कोळी समाजबांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की देतो आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काही कोळी बांधव कार्यकर्ते क्युमाईन क्लब, धुळे याठिकाणी दिनांक २५/०४/२०२३ रोजी पासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत, आज १८ दिवस झाले असून त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे. तरी शासनाकडून कोणत्याही स्वरूपाची दखल घेण्यात आलेली दिसून येत नाही, शासनाच्या ह्या कठोर धोरणामुळे उपोषणकरत्यांचे जीव जाण्याची दाट शक्यता आहे.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा https://youtu.be/n-p1nKiNmxQ
तरी शासनाने उपोषणकरत्यांची लवकरात लवकर दखल घेतली नाही तर आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी, मल्हार कोळी यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी सर्व आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळ संघटनांमार्फत रस्ता रोखो, जलसमाधी, मोर्चे अशी अनेक आंदोलने केले जातील व भविष्यात तीव्र आंदोलन होण्याची शक्यता यावेळी निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली. निवेदनावर आदिवासी वाल्मीकलव्य सेना,वाल्या सेना ग्रुप,अखिल भारतीय कोळी समाज संघटना महाराष्ट्र कोळी समाज संघ, कोळी महासंघ,आदिवासी विकास संघ आदीं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कोळी समाज बांधवाचे स्वाक्षऱ्या आहेत.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/n-p1nKiNmxQ