
बातमी कट्टा:- बैलजोडी चोरी करण्याच्या उद्देशाने येत असल्याच्या रागातून कुऱ्हाडीने घाव घालत वृद्धाचे शिरापासून धड वेगळे केले.याबाबत संशयित घटनास्थळावरून पसार होता.सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने या घटनेचा कसून चौकशी करत अखेर 24 तासाच्या आत संशयिताला ताब्यात घेतले घेतले आहे.

साक्री तालुक्यातील वार्सा येथील वंशा पांडू बोनवणे या 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा दि 17 रोजी सायंकाळी शेतात मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मृतदेहाचे मुंडकेच छाटल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते.धारदार शस्त्राने मानेवर घाव केल्याने नवशा सोनवणे यांचे धडावेगळे शिर गावालगत असलेल्या शेतात आढळून आले.घटनास्थळी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पोलीसांनी धाव घेत चौकशी सुरु केली.
या 75 वर्षीय वृद्धाचा ईतका निर्दयीपणे खून कोणी व का ? केला असावा याचा पिंपळनेर पोलीसांकडून शोध सुरु होता.घटनास्थळी कुठलाही पुरावा नव्हता पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक यांनी शिताफीने कारवाई करत खून करणाऱ्या विनायक नारायण कुवर रा.वार्सा या संशयिताच्या मुसक्या आवळ्ल्या आहेत.
संशयित विनायक कुवर याने खूना बाबत कबुली देत मयत वंशा बोनवणे याला नेहमी काहीना काही वस्तू चोरी करण्याची सवय होती.संशयित विनायक कुवर याने एक आठवड्यापुर्वी नवीन बैलाची जोडी खरेदी केली होती.ती खळ्यामध्ये बांधून ठेवली होती.दि 16 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मयत वंशा सोनवणे हा खळ्याकडे जात असल्याने बैल चोरीचा संशय आल्याने विनायक कुवर याचे वंशा सोनवणे सोबत वाद झाले.वादात विनायक कुवर याने वंशा सोनवणे याच्या मानेवर घाव घालत मुंडक धडा पासुन वेगळे व मृतदेह बाजूच्या शेतात घेऊन गेला.
संशयित विनायक कुवर याला ताब्यात घेण्याची कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील,प्रशांत बच्छाव, उपविभागीय अधिकारी प्रदिप मैराळे,पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे,प्रदीप सोनवणे,विशाल मोहने, चेतन सोनवणे,दत्तु कोळी,शरद चवरे,चंद्रकांत खैरनार, मकयंद पाटील, पंकज वाघ,दावल सैंदाणे,नरेंद्र परदेशी आदींनी कारवाई केली आहे.