बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या १२८ ग्रामपंचायत निवडणूकीच्या उपसरपंचपदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडणार आहे.उपसरपंचपदासाठी अनेक दिवसांपासून काही गावांमध्ये रस्सीखेच सुरु होती यामुळे उपसरपंच पद कोणाकडे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
धुळे जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी आज दि १० रोजी निवड करण्यात येणार आहे.लोकनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड करण्यात येणार आहे.यासाठी प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे निवडणूक निरीक्षक असणार आहेत.उपसरपंच पदासाठी या १२८ पैकी अनेक ग्रामपंचायतीत रस्सीखेच सुरु होती.आज होत असलेल्या या उपसरपंच निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.