बातमी कट्टा:- ग्रामपंचायतीच्या निधीचा सरपंच व ग्रामसेवक यांनी गैरवापर केल्याचा संशय असून याबाबत चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.यांना देण्यात आलेल्या तक्रारी निवेदनात म्हटले की,शिंदखेडा तालुक्यातील मेथी ग्रामपंचायतीत सन एप्रिल 2019 ते 2021 पर्यंत 14 व 15 वा वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणीपुरवठा, निर्मल भारत अभियान,पंचायत युवा खेर क्रिडा या खातांच्या धनादेश वेगवेगळ्या नावाने काढुन त्या पैशांचा सरपंच यांनी स्वताच्या खात्या वर्ग केला असल्याचा संशय असून याबाबत वेळोवेळी माहिती मागून ही सरपंच व ग्रामसेवक यांनी माहिती दिलेली आहे.या तक्रारीची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यांसदर्भात तक्रारी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नरेंद्रकुमार गिरासे,विलास गोसावी, कैलास अहिरे,लोटन सोनवणे,योगेश पाटील,नथा माळी
, बन्सीलाल सोनवणे,प्रमोद गिरासे,सुभम गिरासे आदींसह स्वाक्षऱ्या आहेत.