
बातमी कट्टा:- खूनाच्या गुन्ह्यात त्याचे नाव होते.तेव्हापासून गावातून तो फरार होता.ओळख बदलून राहत होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असतांना तब्बल ११ वर्षानंतर पोलिसांच्या हाती तो लागला असून शिरपूर शहर पोलिस स्टेशनच्या शोध पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/G4dy9QHKQUY?si=pu5Y61l_LhZdVi9P
ही घटना घडली होती शिरपूर तालुक्यातील वरझडी गावात ! मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार २०१३ साली वरझडी गावात संशयित नाना ऊर्फ तुकाराम नारसिंग भिल हा पटांगणामध्ये मुलांसोबत क्रिकेट खेळत होता यावेळी भंगी भुसावळ्या पावरा याच्यासोबत तुकाराम भिल याचा वाद झाल्याने रागाच्या भरात तुकाराम भिल याने भंगी भुसावळ्या याच्या छातीवर दगड मारला आणि यात भंगी भुसावळ्या पावरा याचा मृत्यू झाला.या प्रकरणी मयत भंगी पावरा याचा भाऊ सर्जन पावरा याने तुकाराम भिल विरुध्दात खूनाचा गुन्हा दाखल केला होता.
बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/G4dy9QHKQUY?si=pu5Y61l_LhZdVi9P
घटनेनंतर तुकाराम भील हा गावातून फरार झाला होता. त्याचा शोध सुरु होता तब्बल ११ वर्षानंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस त्या माहिती नुसार शिरपूर शोध पथकाला पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांंनी कारवाई संदर्भात आदेशीत केले.
शोध पथकाचे पथक शिरपूर तालुक्यातील जातोडे गावात गेले यावेळी जातोडे गावात शोध घेतला असता तुकाराम भिल याच्या शिताफीने शोध पथकाने मुसक्या आवळल्या.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशार काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरणार तसेच शोध पथकाचे ललीत पाटील,रविंद्र आखडमल, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, मनोज महाजन, मनोज दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार, भटु साळुंके, सचिन वाघ, आरीफ तडवी तसेच रविंद्र महाले होमगार्ड चेतन भावसार, शरद पारधी, राम भिल व गोपाल अहिरे अशांनी मिळून केली आहे.
बघा व्हिडीओ लिंक https://youtu.be/G4dy9QHKQUY?si=pu5Y61l_LhZdVi9P