त्या दोघांकडून तलवार,कटर आणि दरोडयाचे साहित्य केले जप्त…

बातमी कट्टा:- मध्यप्रदेशातील टोळीचा सशस्त्र दरोडा टाकत मोठा कांड करण्याचा डाव शिरपुर शहर पोलिसांनी उधळून लावला आहे. शिरपुरात काल मध्यरात्री वरझडी रोडवर दरोडेखोरांच्या टोळीला रंगेहाथ पकडण्यात आले, मात्र यावेळी तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाली असून दोघांना अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून तलवार, कटर आणि दरोडयाचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात पो ना भरत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १८ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास शिरपुर शहरात वरझडी रोडवर ५ जणांचे टोळके मोटरसायकलवरुन संशयास्पदपणे फिरत असतांना शिरपुर पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकाला आढळून आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता ते पळू लागले. त्यांचा पाठलाग करीत पोलिसांनी दोघांना पकडले. तर तिन जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पकडलेल्या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक २० हजाराची मोटरसायकल, ५०० रुपये किंमतीची एक धारदार तलवार, एक लाखेंडी कटक, लोखंडी टामी, सुती दोरी, आणि १०० ग्रॅम मिरची पुड, एक प्लास्टीक गोणी असे दरोडा टाकण्यासाठी वापरण्याचे साहित्य मिळून आले. पोलिसांनी बन्सी वैस्ता भिल (वय २७) आणि बिलाल वेस्ता भिल (वय २३) दोघे रा. दिलबा ता. कुक्षी जि. धार मध्यप्रदेश यांना अटक केली. तसेच पळून गेलेल्या तिघांमध्ये पानसींग लक्ष्मण भिल, सोमनी भिल व सोमनीचा एक मीत्र असे तिघे जण असल्याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी ५ जणांच्या विरुध्द शिरपूर शहर पोलिस ठाण्यात भादवि कलम ३९९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: