बातमी कट्टा:- महाराष्ट्र आणि गुजरात सिमेभागलगत तलवारींसह दोन गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ईतके हत्यारे यांच्याकडे कशी व यामागील यांचा काही डाव तर नव्हता याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील पोलीसांना माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे पोलीसांनी अक्कलकुवा बसस्थानकच्या मागच्या बाजूस नदीच्या काठावर शिताफीने सापळा रचत कारवाई केली असता पोलिसांनी कैलास नाईक आणि राजुसिंग शिखलिकर या दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील दोन गावठी पिस्तुल आणि 16 जिवंत काडतूस पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी राजुसिंग चिखलिकर याच्या घराची झाडाझडती घेतली असता घरातून 5 तलवारी आढळून आलेत.

दोन गावठी बंदुक,तलवारी ,जिवंत काडतूस आदी अवैध हत्यारांची यांना काय आवश्यकता होती.या हत्यारा मागील या संशयितांचा नेमका काय डाव होता.या बाबत अक्कलकुवा पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.