बातमी कट्टा:- महिला तलाठी सौ.निशा पावरा यांच्या वर नगरसेवक कडून करण्यात आलेल्या धक्का बुक्की करत मारहाण व शिवीगाळ विरुध्दात सामाजिक संघटनांतर्फे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नगरसेवकाचा पुतळा दहन करत घोषणाबाजी करून रास्ता रोको करत निषेध व्यक्त करण्यात आला.

दिनांक 5 जुन रोजी नंदुरबार येथे महिला तलाठी निशा पावरा हे आपले कर्त्तव्य बजावत असताना नंदुरबार येथील नगरसेवक गौरव चौधरी ह्याने धक्काबुक्की करत मारहाण करत शिविगाळ केल्याचा आरोप करत नगरसेवक गौरव चौधरी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकरणात महिला तलाठीला नगरसेवक गौरव चौधरीने केलेल्या धक्काबुक्की मारहाण शिवीगाळ प्रकरणी आज दि 6 जून रोजी सांगवी पोलीस स्टेशन येथे कठोर गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला तसेच शिरपूर तालुक्यातील आक्रमक संघटनांनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करून नगरसेवक गौरव चौधरीचा पुतळा दहन करण्यात आला.
ह्या वाळू माफिया नगरसेवकावर लवकरात लवकर एक्ट्रासिटी एक्ट अंतर्गत जेरबंद करून कारवाई करावी व ह्याचे पद तात्काळ रद्द करण्यात यावे,असे झाले नाही तर राज्यातील आदिवासी समाजाच्या विविध संघटनांकडून तीव्र निषेध मोर्चा काढ़ण्यात येईल,कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील,अशा आशयाचे निषेध निवेदन सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री.वारे ह्यांना देण्यात आले.
ह्यावेळी बिरसा ब्रिगेड,सातपुडा, जयस महाराष्ट्र शिरपूर, आदिवासी टायगर सेना, आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शिरपूर, जितेंद्र पावरा -शिरपुर तालुका न्युज प्रतिनिधी, आदि संघटनेचे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी तसेच अनेक आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.