त्या पेटीत “अजगर” कोणी ठेवले ? खळ्यात अढळला अजगर असलेली पेटी,वनविभागाच्या कारवाई कडे लक्ष…

बातमी कट्टा:- एका खळ्यात पेटीत दोन भले मोठे अजगर ठेवलेले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.हे अजगर पेटीत आणून या ठिकाणी का व कोणी ठेवले याबाबत तपास सुरु असून चौकशी दरम्यान सर्पमित्राने येथे अजगर ठेवल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि २३ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास मयूर अजितसिंग राजपूत हे शिरपूर शहरातील कोर्टासमोरील त्यांच्या खळ्यात कार लावण्यासाठी गेले असतांना त्या खुल्या जागेवर एक पेटी आढळून आली.त्यांनी पेटीची पाहणी केली असता त्यात दोन अजगर दिसून आले.रात्र आणि अंधार असल्यामुळे मयुर राजपूत यांनी कोणाला काही एक सांगितले नाही.सकाळी दि २४ रोजी या घटनेबाबत त्यांनी पोलीस व वनविभागाला माहिती दिली.घटनास्थळी पोलीस व वनविभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले.

घटनास्थळी वनविभागाने पंचनामा करत पोलीसांच्या समक्ष दोन्ही अजगर वनविभागाच्या ताब्यात दिले.सदर अजगर सर्पमित्राने त्या ठिकाणी ठेवल्याचे चौकशी दरम्यान समजले असून त्याने हे अजगर येथे का ठेवले असावे याबाबत तर्क वितर्क लावण्यात येत असून या बाबत वनविभाग नेमकी काय भूमिका घेते.याबाबत काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: