बातमी कट्टा:- तापी नदी पुलावर अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती.घटनास्थळी शिरपूर व शिंदखेडा पोलीस दाखल झाले होते.महिलेचा मृतदेह आढळून आलेल्या ठिकाणी कुठलाही पुरावा मिळुन आला नव्हता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाकडून तपास सुरु असतांंना महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आता याप्रकरणी गुजरात येथील सुरत येथून एकाला ताब्यात घेतले आहे.सदर महिला मित्रासोबत सुरत येथून चारचाकी वाहनात आली असतांना शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी पुलावर त्या मित्राने त्या महिलेला बेशुध्दीचे औषध सुंगवून बेशुध्द केल्यानंतर गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. सुरत दिंडोली येथून संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे.
दि 5 रोजी सकाळी तापी नदी पुलावरील कठड्याजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.सदर मृत महिलेची ओळख पटू शकलेली नसतांना महिलेने आत्महत्या केली किंवा हा घातपाताचा प्रकार असून मृतदेह अन्यत्र ठिकाणावरून पुलावर आणला असावा याबाबत चर्चा सुरू होती.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पोलीस पाटील दाखल होत सदर घटनेची माहीती पोलीसांना देण्यात आली यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पथक आणि शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पथक दाखल झाले होते.
महिलेचा मृतदेह आढळून आलेल्या ठिकाणी कुठलाही पुरावा पोलीसांना मिळुन आलेला नव्हता याबाबत धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरु होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनखाली याबाबत तपास सुरु असतांना माहिती मिळाली की दि 4 रोजी एक महिल व पुरुष गिधाडे येथील तापी पुलावर रात्री उभे होते त्यांच्यासोबत गुजारत पासिंगची चारचाकी वाहन ते उभी असल्याची माहिती प्राप्त झाली होती.या घटनेचा सुरत येथे जाऊन मोठ्या शिताफीने तपास करण्यात आला सदर मृत महिलेचे नाव माया संदिप पाटील रा. डिंडोली सुरत असे असून त्या महिलेला तीचा मित्र मनोज उर्फ मनोहर युवराज पाटील हा चारचाकी वाहनात नंदुरबार येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली त्यावरुन पोलिसांनी मनोहर पाटील संशयिताला ताब्यात घेत सदर घटनेची कसून चौकशी केली असता सुरत दिंडोली येथील मनोज उर्फ मनोहर पाटील या संशयिताने सांगितले की माया ही देत त्रासाल कंटाळून दि 4 रोजी चारचाकी वाहनाने मनोहर याने मायाला सोबत घेऊन शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी नदी पुलावर आले.तेथे मायाला मनोहर क्लोरोफॉर्म हे बेशुध्दीचे औषध सुंगवून तीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. याबाबत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील,अप्पर अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत,सपोनि प्रकाश पाटील, रफिक पठाण,संजय पाटील,राहुल सानप,गौतम सपकाळे, संदिप सरग,महेंद्र सपकाळ,सुनिल पाटील आदींनी केली आहे.