बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील तापी पुलावर दि २० फेब्रुवारी रोजी निळ्या रंगाची स्कुटी आढळून आली होती.यावेळी महिलेने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.स्कुटीवर असलेल्या क्रमांकावरून महिलेची ओळख पटली होती.महिलेचा तापीत गेल्या तीन दिवसांपासून शोध सुरु असतांना आज दि २३ रोजी सकाळी तापीनदीपात्रात मृतदेह आढळून आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील शिरपूर तालुक्यातील तापी नदीपुलावर दि २० रोजी दुपारी निळ्या रंगाची स्कुटी आढळून आली होती.स्कुटीवरील क्रमांकावरुन स्कुटीची ओळख पटली होती. किरण गणेश देशमुख वय ३५ राहणार कुणाल नगर ,शिंगावे शिवार,शिरपूर असे मृत महिलेचे नाव असून महिलेने तापी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने गेल्या तीन दिवसांपासून किरण देशमुख यांचा तापीनदीपात्रात शोध सुरु होता.आज दि २३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सावळदे तापीनदीपात्रात किरण देशमुख यांचा मृतदेह आढळून आला.आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.मयत किरण देशमुख यांना दोन मुले होत.


