
बातमी कट्टा:- सकाळच्या सुमारास रस्त्याच्याकडेला महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळुन आल्याने खळबळ उडाली होती.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले होते.घटनास्थळी महिलेचा संपूर्ण चेहरा जळून खाक झाल्याने ती महिला नेमकी कोण ? महिलेचा अशा पध्दतीने जाळण्या मागे नेमका उद्देश काय ? या घटनेचा सुत्रधार कोण ? या सर्व गंभीर बाबींचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पोलीसांसमोर उभे राहिले आहे.

आज दि 31 रोजी सकाळच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील करवंद ते नटवाडे रस्त्यावर रस्त्याच्याकडेला एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळुन आला.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पोलीस प्रशासनाचे पथक दाखल झाले.त्या महिलेचे हात व पायाचा पंजा आणि छातीचा भाग वगळता संपूर्ण शरीर जळून खाक झाले होते.अशा भयंकर परिस्थितीत ही महिला नेमकी कोण ? याचा शोध घेणे आता पोलीस प्रशासनासमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.
आगीत संपूर्ण शरीर जळुन खाक झाल्याने महिला कोण हे संकट तर उभे आहेच मात्र या सोबत त्या महिलेला अशा पध्दतीने रस्त्याच्या कडेला आणून कोणी पेटवले ? तीचा नेमका मारेकरी कोण ? त्या यामागील नेमका उद्देश काय ? हे शोध घेणे देखील पोलीसांसमोर मोठे आवाहन म्हणून उभे राहिले आहे.विशेष म्हणजे सदरचा प्रकार आज पहाटेच्या सुमारास घडला असल्याचा प्रथमदर्शनी संशय पोलीसांना आहे. नटवाडे ते करवंद गावापर्यंत कुठे एकही ठिकाणी सी.सी टी.व्ही फुटेज नसल्याने पोलीसांना या घटनेचा तपास करणे आणखी त्रासदायक ठरणार आहे.
