बातमी कट्टा:- रुग्णांच्या नावाने रुग्णवाहिकेतून गुरांची वाहतुकीचा संतापजनक प्रकार शिरपुर शहर पोलिसांनी तालुक्यातील वाडी येथे बुधवारी सकाळी उघडकीस आणला असून 6 गोवंश गाईसह रुग्णवाहिकासह 2 लाख 86 हजार रुपयांच्या मुद्देमाल ताब्यात घेत चालकास अटक केल्याची कारवाई करण्यात आली.
मध्यप्रदेश राज्यातील एका अम्ब्युलन्स मधून गाईंची वाहतूक करण्यात येत असून बोराडी मार्गे शिरपुर कडे येत असल्याची गोपनीय माहिती शिरपुर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना बुधवारी पहाटे मिळाली. मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने वाडी येथे सापळा रचला होता.दरम्यान सकाळी सव्वा 7 वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने एमपी 09 एफए 4593 क्रमांकाची फोर्स कंपनीची अम्ब्युलन्स थांबवून चौकशी केली असता रुग्णांच्या नावाने अम्ब्युलन्स मधून गुरांची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले.पोलीस पथकाने सदर अम्ब्युलन्स ताब्यात घेत अम्ब्युलन्स मधून 36 हजार रुपये किमतीच्या 6 गाईंची सुटका करून 2 लाख 50 हजार रुपये किमतीची अम्ब्युलन्स 2 लाख 86 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आणि चालक विजय पौलाद चव्हाण वय 23 रा.मेहु ता जि इंदोर मध्यप्रदेश यास ताब्यात घेत चालकास अटक करण्यात आली.