
बातमी कट्टा:- जळगाव शहरातील मेहरून परिसरातील स्मशानभूमीत एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. स्मशानभूमीतून अस्थी चोरीला गेल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
छबाबाई काशिनाथ पाटील यांचे रविवारी (५ ऑक्टोबर) निधन झाले होते आणि सहा ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आज (७ ऑक्टोबर) त्यांच्या कुटुंबीयांनी अस्थी संकलनासाठी स्मशानभूमीत भेट दिली असता, अस्थी गायब असल्याचे लक्षात आले.
कुटुंबीयांचा संशय आहे की, प्रेताच्या अंगावरील सोन्यासाठी चोरट्यांनी अस्थी चोरून नेल्या असाव्यात. या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांनी जळगाव महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्मशानभूमीत ना सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ना सुरक्षारक्षक — त्यामुळेच अशा घटनांना आमंत्रण मिळाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुरेश भोळे हेही घटनास्थळी दाखल झाले. “आमच्या भावनांशी खेळ झाला आहे,” अशी भावना पाटील कुटुंबीयांनी व्यक्त केली.

महत्वाचा प्रश्न: सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये सुरक्षेचा अभाव का?स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनीही या प्रकारावर संताप व्यक्त करत, तत्काळ चौकशीची मागणी केली आहे.