बातमी कट्टा:- तोरणमाळ येथील सिंदीदिगर रस्त्यावरील दरीत बोलेरो वाहन कोसळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत यात मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ सिंदिदिगर रस्त्यावर प्रवासी वाहतुक करणारी बोलेरो गाडी दरीत कोसळुन भिषण अपघात घडल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे।या अपघातात आठ जणांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत आहे तर 4 जण जखमी झाले आहेत.यात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत घटनास्थळी कुठल्याही कंपनीचे नेटवर्क नसल्याने माहीती आणि बचाव कार्यास त्रास होत असून घटनास्थळी बचावकार्य आणि मदत कार्याला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.मात्र स्थानिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली आहे.स्थानिक पोलीस प्रशासन गावकऱयांच्या मदतीने बचाव कार्य सुरु असून पोलीस अधिक्षकांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी रवाना करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

या अपघातात मध्यप्रदेश राज्यातील बडवणी जिल्हा येथील शमलेट ता पाटी येथील रहिवाशी आहेत असून शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन येथे भजनाच्या कार्यक्रमासाठी जात असतांना हा अपघात घडल्याची माहिती प्राप्त होत आहे.या अपघातात मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.