बातमी कट्टा:- पेट्रोलपंप चालक मोटारसायकलीने जात असतांना पाच दरोडेखोरोंनी त्यांना अडवून डोळ्यात मिर्ची पावडर फेकत मोटरसायकलीला लावण्यात आलेली पैसांची बॅग घेऊन दरोडेखोर पसार झाले होते.पोलिसांनी आता त्यातील चार दरोडेखोरांना मध्यप्रदेश राज्यातून ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला आहे.

शिरपूर तालुक्यातील खंबाळे येथील शर्मा पेट्रोलपंप चालक संजय शर्मा हे नेहमी प्रमाणे दि 1 रोजी रित्री 8:30 वाजेच्या सुमारास दिवसभरातील पेट्रोल व डिझेलची रोकड घेऊन मोटरसायकलीने जात असतांना खंबाळे पासून 2 किमी अंतरावर 5 दरोडेखोर मोटरसायकलीने आले. त्या 5 दरोडेखोरोंनी संजय शर्मा यांच्या डोळ्यात मिर्ची पाऊडर फेकून मोटरसायकलीच्या हँडलला अडकवलेली रोकड पैशांची बॅग घेऊन दरोडेखोर पसार झाले.याबाबत संजय शर्मा यांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे घटनेची माहिती देत गुन्हा दाखल केला.
तालुका पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी तात्काळ पोलीस पथकासोबत घटनेची चौकशी सुरु केली.ते दरोडेखोर कुठे पळाले,कोणत्या दिशेने गेले काही एक माहिती नव्हती.यावेळी संपूर्ण परिसर त्यांनी पिंजून काढला.यावेळी त्यातील एका संशयिताचे नाव पोलिसांना निष्पन्न झाले.पोलिसांनी तात्काळ मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील बडीयापाणी येथून संशयित राहुल मिरचंद्र पावरा याला शिताफीने ताब्यात घेतले व त्याच्या कडून सोबत असलेल्या संशयिताचे नावांची माहिती घेतली यावेळी पोलीसांना प्राप्त झालेल्या नावांच्या आधारे संशयितांचा शोध सुरु केला.यासाठी दोन पथके तयार करण्यात आले.
पोलिसांनी संशयित रोशन आसाराम पावरा रा.बडीयापाणी मध्यप्रदेश,अजय सुरेश निंगवाले रा.बडीयापणी,राहुल पावरा रा.खुटवाडी मध्यप्रदेश यांचा शोध सुरु केला यावेळी हे तिघेही संशयितांना पोलीस मध्यप्रदेश राज्यातून ताब्यात घेतले.व या चारही संशयितांकडून लुटलेले 1 लाख 56 हजारांची रोकड व एक 30 किंमतीची इग्नीटर मोटरसायकल जप्त करण्यात आली.
या कारवाईसाठी सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ,नरेंद्र खैरणार,दिपक वारे,लक्ष्मण गवळी,चत्तरसिंग खसावद,योगेश योभाडे,योगेश मोरे,संजय देवरे,गोवींद कोळी,महेंद्र वानखेडे, योगेश गिते,इसरार फारकु,सईद शेख आदींनी कारवाई केली आहे.