बातमी कट्टा:- दरोड्याच्या प्लॅनींग ने आलेल्या धुळ्यातील चार दरोडेखोरांना चाकु,दोर,मिर्ची पावडर, कटर आदी साहीत्यांसह पोलिसांनी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडील चारचाकी वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे.कुठेतरी दरोडा टाकण्याच्या प्लॅनींग असतांना पोलिसांनी वेळीच त्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्याने संभाव्य धोका टळला आहे.

अमळनेर तालुक्यातील अमळगावात मारवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठेकर,हवालदार विजय होळकर,किरण पाटील आदी जण गस्त घालत असतांना पहाटे 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास अमळगाव येथील बसस्टॉप जवळ एक युवक संशयास्पद रीत्या फिरतांना दिसून आला.मात्र पोलिसांचे वाहन पाहून तो पळत सुटला यावेळी पोलिसांनी पाठलाग करतांना बसस्थानक भागातील दुकानांच्यामागे चारचाकी कार दिसून आली.

पोलीस कार जवळ गेले असता कारमधील दोन संशयितांनी पळ काढला. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्या दोघांना ताब्यात घेतले.अतर अन्य दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीसांनी कारची तपासणी केली असता कार मध्ये 7 कटर, 2 चाकु,दोर धारदार हत्यारे ,मिर्ची पावडर व मोबाईल पोलिसांना मिळुन आला.पोलिसांनी संशयित नईमशहा सलीमशहाफकीर वय रा.भोईवाडा धुळे,मोहमद असरफ मोहमद बशीर अन्सारी वय 29 रा.शहीद अब्दुल हमीदनगर धुळे, अतिकुर रेहमान मोहम्मद सलीम अन्सारी वय 37 रा. धुळे,आबीदशहा पीरमशहा फकीर वय 26 रा.धुळे या चारही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत एकुण 1 लाख 5 हजाराचा मुद्देमाल मारवड(अमळनेर) पोलीसांनी जप्त केला आहे.
कुठेतरी दरोडा टाकण्याच्या प्लॅनींग असतांना पोलिसांनी वेळीच त्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्याने संभाव्य धोका टळला आहे.